Your Ad Here
O बातमीदार परिवारात सामिल व्हा O बातम्या, माहिती, छायाचित्रे, नवीन ब्लॉगची माहिती पाठवा O पत्ता - blogeditor.acidic@gmail.com O कळते-समजते व बातमीदारची विकिपीडियामध्ये दखल O

दिनकर रायकर, पद्मभूषण देशपांडे, प्रकाश जोशी आदींना राष्ट्रवादीचा पुरस्कार
४ फेब्रु./मुंबई
राष्ट्रवादी संकल्प या हिंदी साप्ताहिकाने पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली आहे.

पुरस्कारप्राप्त पत्रकार  -
पत्रकारिता जीवनगौरव - दिनकर रायकर (संपादक, लोकमत)
मराठी पत्रकारिता - पद्मभूषण देशपांडे (मुख्य वार्ताहर, सकाळ)
इंग्रजी पत्रकारिता - प्रकाश जोशी (टाइम्स ऑफ इंडिया)
हिंदी पत्रकारिता - बृजमोहन पांडे (नवभारत)
गुजराती पत्रकारिता - पिंकी दलाल (संपादक, मुंबई समाचार)
उर्दू पत्रकारिता - सर्फराज आरजू (संपादक, हिंदुस्थान)

५१ हजार रुपये आणि मानपत्र असे जीवनगौरव पुरस्काराचे, तर ११ हजार रुपये आणि मानपत्र असे अन्य पुरस्कारांचे स्वरूप आहे.

येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता चर्चगेट येथील क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाच्या सी. के. नायडू सभागृहात विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तारीक अन्वर हे या साप्ताहिकाचे संपादक आहेत.

Read more...

नवप्रभाचे माजी संपादक शांताराम बोकील यांचे निधन
४ फेब्रु./पणजी
जुन्या पिढीतील एक ध्येयवादी पत्रकार व दैनिक नवप्रभाचे माजी संपादक शांताराम बोकील (वय ८२) यांचे काल शाहूवाडी-कोल्हापुर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
 
पत्रमहर्षी श्री. द्वा. भ. कर्णिक यांच्या कारकिर्दीत नवप्रभेच्या सुरवातीच्या संपादकीय कर्मचाऱ्यांपैकी असलेले श्री. बोकील पाच वर्षे सहसंपादक पदावर होते. श्री. कर्णिक यांचा कार्यकाल पूर्ण होताच ते नवप्रभेचे कार्यकारी संपादक बनले. एक वर्ष कार्यकारी संपादक पदावर राहिल्यानंतर सुमारे एक वर्ष ते संपादकपदावर होते. त्यानंतर त्यांनी पुढारी, नागपूर पत्रिका अशा दैनिकांत काम केले. श्री. बोकील यांना शेती या विषयात विलक्षण आस्था होती. महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य कोल्हापुरात होते.

Read more...

चंद्रशेखर कुलकर्णी, दिनेश गुणे लोकमतमध्ये
३ फेब्रु./मुंबई
ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी, तसेच दिनेश गुणे लोकमतमध्ये दाखल झाले असल्याचे समजते. लोकमतमध्ये न्यूजब्युरो स्थापन करण्यात येत असून, हे दोघे त्याचे काम सांभाळतील असे कळते.

चंद्रशेखर कुलकर्णी हे यापूर्वी लोकसत्ताचे सहसंपादक होते. साधारणतः दीड महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता ते लोकमतचे सहसंपादक म्हणून काम पाहतील.

दिनेश गुणे हे ज्येष्ठ वार्ताहर असून, ते सकाळ न्यूज नेटवर्कचे मुंबईतील प्रतिनिधी होते. लवकरच त्यांच्याकडे सकाळच्या सहसंपादकपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार होती, असे सांगण्यात येते. मात्र तत्पूर्वीच त्यांनी सकाळला रामराम ठोकला.

दरम्यान, लोकमतच्या राज्यभरातील आवृत्यांना अधिक दर्जेदार मजकूर पुरवणे, हे लोकमत न्यूजब्युरोचे मुख्य काम असणार आहे, असे सांगण्यात येते. त्या दृष्टिकोनातूनच या ब्युरोची जबाबदारी चंदू कुलकर्णी, दिनेश गुणे यांच्यासारख्या अनुभवी पत्रकारांकडे सोपविण्यात येत असून, त्यात आणखी काही बातमीदारांची भर्ती करण्यात येणार असल्याचे कळते.

Read more...

पत्रकारांच्या संरक्षणाचा अध्यादेश लवकरच
३ फेब्रु./मुंबई
पत्रकारांच्या संरक्षणाच्या कायद्याचे विधेयक विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मांडण्यात येईल. तत्पूर्वी येत्या १५ दिवसांच्या आत तसा अध्यादेश काढण्याचा निर्णय गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्र अय्यंगार, विधी व न्याय विभागाचे सचिव ह. बा. पटेल, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव, सह पोलिस आयुक्त हिमांशु रॉय आदी; तसेच पत्रकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read more...

मनीष केळकर यांच्या आत्महत्येच्या कारणांचे गूढ
३ फेब्रु./मुंबई
सामनाचे वरिष्ठ उपसंपादक मनीष केळकर यांच्या आत्महत्येमागे नेमकी कोणती कारणे असावीत, याबाबत सध्या मुंबईतील पत्रकारविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे.

कार्यालयातील वरिष्ठांच्या छळास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती असे याआधीच्या कळते-समजतेच्या बातमीत म्हटले होते. त्याचबरोबर मनीष यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती  व त्यात आपल्या वरिष्ठांची नावे नमूद केली होती, असेही त्या बातमीत म्हटले होते. मनीष यांच्या काही सहका-यांनी दिलेल्या माहितीवरुन ती बातमी देण्यात आली होती. मात्र नंतर, तशी कोणतीही चिठ्ठी मनीष यांनी लिहिली नव्हती असे स्पष्ट झाले. त्यामुळे ती चुकीची माहिती असलेली बातमी कळते-समजतेवरून काढून टाकण्यात आली. (याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. - ब्लॉगएडिटर)

असे असले, तरी मनीष यांना कार्यालयात त्रास देण्यात येत होता, विद्याधर चिंदरकर त्याचा छळ करीत होते व त्यामुळेच मनीष यांनी आत्महत्या केली, असा आरोप मनीषचे वडील, सामनाचे मुख्य छायाचित्रकार सुरेश केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. याबाबत पोलिस चौकशी सुरु आहे. दुसरीकडे मनीषच्या आईने पोलिसांनी दिलेल्या जबानीत, मनीषने आत्महत्या करण्यापूर्वी आपण घर सोडून जात आहोत, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे या आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

दरम्यान, मनीषसारख्या तरूण पत्रकाराची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना असून, कार्यालयीन छळामुळे त्यांनी स्वतःचे जीवन संपविले असेल, तर त्यास जबाबदार असणारांना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र तसे नसेल, तर विनाकारण कोणाची बदनामी होऊ नये, अशा प्रतिक्रिया पत्रविश्वातून उमटत आहेत.

Read more...

मनीष केळकर आत्महत्येबद्दलची बातमी मागे घेण्यात आली. SORRY.

Read more...

कळते समजते विषयी

मराठीतील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या सगळ्या जगाच्या बातम्या देतात. पण त्यांच्या बातम्या कोण देणार?
कितीतरी गोष्टी घडत असतात तेथे. काही नवे प्रयोग होत असतात, माणसे बदलत असतात, कुणाची बदली होते, कुणाला बढती मिळते, कोणी पुरस्काराचे मानकरी ठरते, तर कुणाचे नवे पुस्तक येते... शिवाय आपल्या रोजच्या चघळण्यातले गॉसिप असतेच असते!
मराठी मीडियाविश्व हे जर एक कुटुंब मानले, तर त्यात काय चालले आहे हे आपणांस समजायलाच हवे. कळते समजतेचे उद्दीष्ट आहे ते हेच. ए-सिडिक कम्युनिकेशन्सचा हा नवा उपक्रम आपणांस निश्चित भावेल, अशी आशा आहे. - ब्लॉगएडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स

मेलएक्स्प्रेस

Its Like a Revolution...
Hi Bapu,First of all thanks a lot to Bapu Atrange and Company for catering sucha nice and ' readable' bolg. Its good that Batmidaar is not only agossip corner ( though we all like it and its our profession), but alsoserves valuable information on it. Now many Marathi journalist arefree to express via this new medium. Its like a revolution in MarathiJournalism as our community is not very 'open' to all. Pepole havemany misconceptions and prejudise about our field. (Sometimes evenparanoied). The main reason is, they are very ill-informed. I am suresuch Bolg journalism will help to improve the condition. Sometimes weare equally responsible for it.
I also congratulate Yogesh Joshi, HT for the news article published in HT regarding Marathiblogs. I am regular reader of your Blog and a journalist by professionfrom last five years in Pune, but out of focus for few years andplannning to come back soon. I am also starting my own blog soonand meet all of you through it. Though I am into English journalismnow, my blog will be in Marathi. (I started with Loksatta). I wishBapu & Co. very All the Best !!! Cheers!
- Hrishikesh Joshi, Pune

काबिल-ए-तारीफ !
आपला हा बेब पत्रकारितेचा नवा प्रयोग खरोखरच काबिल-ए-तारीफ आहे. लेखणीचा वरदहस्त असतानाही केवळ माध्यमाअभावी अनेक पत्रकारांना आपली लेखनउर्मी दाबून ठेवावी लागते. यात अनेकदा त्यांच्यातील पत्रकार कोमेजून जातो आणि एका आज्ञाधारक ( पाट्या टाकणाऱ्या) कारकुंड्या पत्रकाराचा जन्म होतो. ही गोष्ट असह्य आणि खुपच भयंकर अशी असते. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या धुमाकूळात तर याची शक्यता सर्वाधिक आहे. पण आपल्याकडे विषय, वेळ आणि माध्यम यांची कसलीच अट नाही. त्यामुळे अनेक उपाशी पत्रकारांची सोय झाली आहे.
- गिरीश अवघडे,
दै. पुढारी, नवी दिल्ली.


चांगली माहिती देता...
Mee Subhash Naik. Niwrutta Patrakaar. Sadhya USmadhye majhya mulaakade aaloy. Majhya eka mitrane tumachya blogchi link pathawali. Blog khup aawadalaa. Changali mahiti detaa.
- Subhash Naik.
Free Lance Journalist, Pune.
(Now in Nashua,NH,USA)


हे हवेच होते...
पत्रकार सा-या दुनियेच्या बातम्या सांगतात. पण ते मात्र बातम्यांमधून उपेक्षितच राहत असून, क्वचितच त्यांच्यासंबंधीच्या बातम्या छापून येत असतात. परंतु त्यांच्या विश्वात काय चालले आहे, ते आम्हां वाचकांनाही आता या साइटद्वारे कळण्याची सोय झाली आहे. हे असे ब्लॉगपत्र हवेच होते. तुमच्या उपकक्रमास हार्दिक शुभेच्छा.
- विजय तांबे, पुणे

बातमीदार आवडतो
आपला "बातमीदार" फार आवडतो. अनेक उत्कृष्ट "पोस्ट्स" द्वारे आम्हा वाचकांना आनंद दिल्याबद्दल आपले आभार.
उ.सं.डु. (उपसंपादकाच्या डुलक्या) आणि मराठीचा अयोग्य वापर यासंदर्भात दोन बातम्या आपल्याबरोबर शेअर करायच्या होत्या.
१. कसाब हा "आपलाच" मुलगा आहे, हे त्याच्या पाकिस्तानी वडिलांनी कबूल केल्यावर त्यासंबंधी एका वाहिनीने न्यूज दिली - कसाब हा मुलगा असल्याची त्याच्या वडिलांची कबूली! (स्टार माझा का आय्.बी.एन. आठवत नाही.)
२. त्यानंतर लगेच ब्रेक आला, त्यात एका साबणाची जाहिरात होती. मूळ हिंदी जाहिरात योग्य असावी. मराठीत मुलगा म्हणतो "जड (का असंच काहीतरी विशेषण) पाण्याने धूताना आईला त्रास होतो". देवा! मायामी हेराल्ड मध्ये डेव्ह बॅरी ह्यांनी कित्येक वर्षे उपरोधिक विनोदी शैलीत लिखाण केलं. त्यातील अनेक विचित्र, विक्षिप्त, हास्यास्पद वृत्तांची माहिती त्यांना त्यांचा वाचकवर्ग पुरवत असे. कित्येक सामान्यजन बातमी पुरवू शकतात. मात्र त्यावर मार्मिक, खुमासदार आणि रंजक भाष्य/लेखन करण्याची योग्यता त्यांच्या अंगी नसते. तुम्ही ही असं करावं असं वाटतं.
- मुकुल जोशी
http://mukulayan.blogspot.com/


पत्रकारांना आवाहन

मराठी प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रातील घटना-घडामोडींची माहिती देण्यासाठी हे ब्लॉगपत्र सुरु करण्यात आले आहे. आपणही यात सहभागी होऊ शकता. आपल्या वृत्तपत्र वा वृत्तवाहिनीतील घडामोडी (हार्ड न्यूज ओन्ली!) आपण आम्हांस कळवा. आपल्या वृत्तपत्रातील नवे बदल, पत्रकारांच्या बदल्या, बढत्या, आपणांस वा आपल्या सहका-यांस मिळालेले पुरस्कार यांसारखी माहिती आम्हांस कळवा. वेळोवेळी अशा बातम्या त्या-त्या वृत्तपत्रात येतच असतात. पण अनेकदा त्या केवळ त्या वृत्तपत्राच्या वाचकांपुरत्याच मर्यादित राहतात. ही मर्यादा ओलांडण्यासाठी आपण ती माहिती, त्या बातम्या येथे प्रसिद्ध करू.
अखेर मित्रहो, आपला व्यवसायच माहितीच्या आदान-प्रदानाचा आहे!

आपण वा आपला सहकारी ब्लॉगिंग करत असेल, तर त्याविषयीची माहितीही कळवा. आपले लेखन बातमीदार, सहयोगी बातमीदार आणि कळते समजतेच्या माध्यमातून अधिक वाचकांपर्यंत जावे, असे आम्हांस वाटते. त्यादृष्टीने येथे पत्रकारांच्या ब्लॉगच्या लिंक्सही देण्यात येणार आहेत.

आपल्या सहकार्यानेच हे ब्लॉगपत्र यशस्वी होऊ शकेल!
आमचा पत्ता - blogeditor.acidic@gmail.com
(कॉमेन्ट्सच्या माध्यमातूनही आपण ही माहिती कळवू शकता.)
- ब्लॉगएडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स

  © Blogger template Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP