'ऍग्रोवन'चे विजय गायकवाड यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार
२८ जून/मुंबई
वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे यंदाच्या कृषी पत्रकारिता पुरस्कारासाठी 'ऍग्रोवन'चे मुंबईतील प्रतिनिधी विजय गायकवाड यांची निवड झाली आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. निलय नाईक यांनी मंत्रालयामध्ये नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. यावेळी प्रतिष्ठानच्या अन्य पुरस्कार विजेत्यांची नावेही जाहीर करण्यात आली.
रोख ११ हजार रुपयांचा हा पुरस्कार वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी, १ जुलै रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा के. सी. कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
विजय गायकवाड यांचा परिचय (त्यांच्या ऑर्कुट अकाऊंटवरून) -
विजय श्रावण गायकवाड यांचा जन्म मु.पो. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि. अहमदनगर येथे शेतकरी कुटुंबात झाला आहे. बारावी पर्यंतचं शिक्षण गावात घेऊन बी.एस्सी. (ऍग्री) त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या पुणे कृषी महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारीतेच शिक्षण पूर्ण केले असून, सध्या ते मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी 'कृषी पर्व' नावाचे नियतकालिक सुरू केले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांचे सकाळ, लोकमत या दैनिकांतून शेतीविषयक लिखाण प्रसिद्ध झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या 'सनराईज' शेतीविषयक मासिकाच्या उपसंपादकपदाची जबाबदारी सांभाळली.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व शिवराय टेक्नॉलॉजीज लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या 'परिवर्तन.नेट' या वेब पार्टल साठी त्यांनी 'कृषी-विषयतज्ञ' म्हणून जबाबदारी पाहिली. त्याच कालावधीत शेतीमधे माहितीतंत्रज्ञान ह्या उपक्रमाअंतर्गत युरेप गॅप, औषधी वनस्पती व आंबा लागवडीवरील मल्टिमीडिया सीडी निर्मितीमधे योगदान दिले. तद्नंतर पुण्यातील निमित्य एंटरप्रायझेस या कृषी पदवीधरांच्या स्वयंरोजगार उपक्रमाअंतर्गत त्यांनी कृषी पर्यटन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, भाजीपाला निर्जलीकरण, भाजीपाला रोपवाटिका, बीज प्रक्रिया आदी विषयांवरील व्हिडिओ निर्मितीचे काम केले. त्याच दरम्यान सुरू झालेल्या 'ऍग्रोवन' या शेतीविषयक दैनिकासाठी लिखाण सुरू केले. काही काळ इंडोग्लोबल ऍग्रो प्रा.लि. या कंपनीत शेतीविषयक सॉफ्टवेअर निर्मितीमधे काम केल्यानंतर ऑक्टोबर 2006 पासून विजय गायकवाड ऍग्रोवन दैनिकाचे मुंबई प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे, बातमीदारीतून वेळ काढून विजय गायकवाड त्यांच्या टाकळी ढोकेश्वर येथील शेतात शेतीचे प्रयोग करत असतात.
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता
-
साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई
असे
दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...

0 प्रतिक्रिया:
Post a Comment